एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून इम्तियाज जलील यांचा खोचक टोला, म्हणाले...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून इम्तियाज जलील यांचा खोचक टोला, म्हणाले…

| Updated on: Jun 16, 2023 | 7:41 AM

VIDEO |एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला खोचक टोला, म्हणताय, 'देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं...'

औरंगाबाद : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले तर विरोधकांनीही जोरदार हल्लाबोल केला. अशातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरून खोचक टोला लगावला आहे. ‘एकनाथ शिंदे यांना कुठेतरी वाटत असावे की देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि आपण राज्यात राहावे त्यामुळे ही जाहिरात दिली असावी, प्रत्येकाची एक महत्वकांक्षा असते त्यातून घडलं असावं’, असे ते म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस हे केंद्रात खूप चांगले काम करू शकतं त्यांचं भविष्य सुद्धा केंद्रातच आहे, नरेंद्र मोदी नंतर भाजपची सर्वात चॉईस ही फडणवीस आहे, त्यांची क्षमता आहे ते देशाला सांभाळू शकतात, योगी आणि फडणवीस यांच्यात फडणवीस ही चांगली चॉईस असू शकते राजकारणात काहीही होऊ शकते. देवेंद्र फडणवीस या कारणामुळे नाराज होऊ शकतात कारण तेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असेही ते म्हणाले.

Published on: Jun 16, 2023 07:41 AM