Prashant Bamb | प्रशांत बंब यांच्याकडून MIMचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक

Prashant Bamb | प्रशांत बंब यांच्याकडून MIMचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक

| Updated on: Aug 13, 2021 | 3:36 PM

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची खासदार भागवतराव कराड यांच्याशी बरोबरी करणं सोडाच पण एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलीलही खैरेंपेक्षा चांगले खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची खासदार भागवतराव कराड यांच्याशी बरोबरी करणं सोडाच पण एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलीलही खैरेंपेक्षा चांगले खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केले. चंद्रकांत खैरे हे जळक्या वृत्तीचे आहेत. त्यांनी औरंगाबाद शहराची वाताहात केली, अशी टीकाही प्रशांत बंब यांनी केली.

चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवासाठी भाजप नेत्यांना जबाबदार धरत आगपाखड केली होती. या टीकेला प्रशांत बंब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत खैरे स्वत:ला भागवतराव कराडांपेक्षा मोठा नेता म्हणवतात. पण खैरे भागवत कराडांची बरोबरी कधीच करु शकत नाहीत. औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळे केल्याची टीका प्रशांत बंब यांनी केली. त्यामुळे आता यावर चंद्रकांत खैरे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.