अब्दुल सत्तार सामनावर अब्रु नुकसानीचा दावा करणार, काय आहे प्रकरण?
VIDEO | गेल्या दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्यावर सामनातून झालेले आरोप नेमके काय? बघा व्हिडीओ
मुंबई : ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात आणि अंबादास दानवे यांच्याविरोधात कृषीमंत्री अंबादास दानवे यांनी अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. सामना या वृत्तपत्रातून अब्दुल सत्तार यांच्यावर अपहाराचे आरोप करण्यात आले. त्या विरोधातच अब्दुल सत्तार आक्रमक झाले असून सत्तार सामनावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्यावर सामनातून जे आरोप करण्यात आले ते असे होते की, कृषी उद्योग विकास महामंडळात १५० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती आहे, ऑरगॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकच संचालक असलेल्या दोन संस्था मॅनेज करून टेंडर दिल्याचा आरोप झाला. केबीबायो ऑरगॅनिक प्रा, ली. आणि न्यूएज एॅग्रो इनोव्हेशन कंपन्यांकडून घोटाळा झाल्याचा आरोप तर दोन्ही कंपन्यांचा संचालक एकच असून अब्दुल सत्तार यांच्या जवळचा असल्याची माहिती असल्याचा आरोप करण्यात आली आहे.