VIDEO : Nanded | मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगड फेकला; पोलीस घटनास्थळी, कारण अस्पष्ट

VIDEO : Nanded | मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगड फेकला; पोलीस घटनास्थळी, कारण अस्पष्ट

| Updated on: Sep 01, 2021 | 1:26 PM

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या घरावर दगड फेकण्यात करण्यात आली आहे. नांदेडमधील बंगल्यावर एका महिलेने ही दगड  फेक केल्याची माहीती मिळत आहे. या दगडफेकीमुळे अशोक चव्हाण यांच्या सुरक्षा कक्षाच्या काचेचं  नुकसान झालं आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या घरावर दगड फेकण्यात आला आहे. नांदेडमधील बंगल्यावर एका महिलेने ही दगड फेक केल्याची माहीती मिळत आहे. असे सांगितले जात आहे की, महिला रस्त्यावरुन भांडत जात होती. त्यावेळी तिने फेकलेला दगड अशोक चव्हाणांच्या बंगल्याच्या दिशेने आला. त्यातील एक दगड बंगल्यावर लागला. या दगडफेकीमुळे अशोक चव्हाण यांच्या सुरक्षा कक्षाच्या काचेचं  नुकसान झालं आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

 

Published on: Sep 01, 2021 01:24 PM