Chandrakant Patil : माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात… चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
VIDEO | सोलापूरचे नवे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर कंत्राटी भरतीविरोधात शाई फेक करण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले होते. शाईफेकीच्या घटनेवर चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत मी कशासाठी ही तयार असतो, माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट...
अमरावती, २० ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरचे नवे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर कंत्राटी भरतीविरोधात शाई फेक करण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. पिंपरीनंतर सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. सरकारने वेगवेगळ्या खात्यांमध्ये सुरू केलेली कंत्राटी भरती बंद करा, यासाठी भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याकडून शाई फेक करण्यात आली होती. विशेष म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांचा पहिलाच सोलापूर दौरा असताना हा प्रकार घडला होता. दरम्यान, या शाईफेकीच्या घटनेवर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमरावतीमध्ये असताना काही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांची पुरेपूर सुरक्षेची काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कशासाठी ही तयार असतो, माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाही फेकली की मी लगेच दुसरे शर्ट घालतो. आतापर्यंत दोनदा शाही फेकली पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.