छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ भूमिकेवरून कॅबिनेटमध्ये हंगामा, बघा काय झाली खडाजंगी?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळात खडाजंगी झाल्याची सुत्रांची माहिती आहे. भुजबळांची वक्तव्य तेढ निर्माण करणारी आहेत. अशी नाराजी मराठा मंत्र्यांनी व्यक्त केली. तर मराठा मंत्री आक्रमक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी भुजबळ यांना साथ दिल्याचे पाहायला मिळाले
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | कुणबी दाखल्यांवरून मंत्री छगन भुजबळ ज्यापद्धतीने सरकारवर आक्रमक झालेत. त्यावरून कॅबिनेटच्या बैठकीतही त्यांचे पडसाद उमटले. मराठा मंत्री आक्रमक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे हे भुजबळांच्या मदतीसाठी धावून आलेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळात खडाजंगी झाल्याची सुत्रांची माहिती आहे. भुजबळांची वक्तव्य तेढ निर्माण करणारी आहेत. अशी नाराजी मराठा मंत्र्यांनी व्यक्त केली. तर मराठा मंत्री आक्रमक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी भुजबळ यांना साथ दिल्याचेही कळतंय. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे भुजबळांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. भुजबळांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत बीडमधील जाळपोळीच्या घटनेची माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट