तर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळ यांनी लगावला खोचक टोला

तर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळ यांनी लगावला खोचक टोला

| Updated on: Aug 18, 2024 | 4:11 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण द्यावे, ही मागणी लावून धरली आहे. जर आरक्षण दिले नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे २८८ मतदारसंघात आपले उमेदवार देणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २८८ मतदारसंघात २८८ उमेदवार उभे करावेत, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत जास्त उमेदवार निवडून आले तर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील, असा खोचक टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या देऊन चालत नाही, असेही छगन भुजबळ यांनी वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना वेळ द्या…मला शिव्या देऊन काय फायदा आहे, तुमचे उमेदवार निवडून आले की तुमचा विजय होणार आहेत, असे म्हणत छगन भुजबळ यांनी खोचक वक्तव्य केले आहे. तर तुमचा विजय झाला म्हणलेज तुम्ही मुख्यमंत्री होणार.. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिव्या शाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच आपलं वागणं सुधारलं पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना खोचक सल्ला दिला आहे.

Published on: Aug 18, 2024 04:11 PM