‘शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून जरांगेंच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या’, भुजबळांनी वाचला तक्रारीचा पाढा
विधानसभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या तक्रारीचा पाढाच वाचल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते असे म्हणत असताना भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या जरांगेचा उल्लेख केला, अहो ते सतत....
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : विधानसभेत मराठा आरक्षणाचा मसुदा मंजूर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांची तक्रार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर केली. विधानसभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या तक्रारीचा पाढाच वाचल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते असे म्हणत असताना भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या जरांगेचा उल्लेख केला, अहो ते सतत धमक्या देत आहेत. याला टपकवीन, त्याला टपकवीन. मला स्वत:ला धमकी. अध्यक्ष महोदय, हे काय आहे? एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अहो, आईवरुन शिव्या दिल्या. तिथे महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर त्यांना ते म्हणतात की तुम्ही भाडखाऊ आहात. त्यांनाही आईवरुन शिव्या. अध्यक्ष महोदय, ही जी दादागिरी सुरु आहे त्याला कंट्रोल करणार आहात की नाही? असा सवालही त्यांनी केला.