कुणाचं खाताय… तुझं खातोय काय रे? छगन भुजबळ यांचा जरांगे पाटीलवर यांच्यावर थेट शाब्दिक वार

कुणाचं खाताय… तुझं खातोय काय रे? छगन भुजबळ यांचा जरांगे पाटीलवर यांच्यावर थेट शाब्दिक वार

| Updated on: Nov 17, 2023 | 3:25 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळणार असं वारंवार म्हणताय. तर ओबीसी आमचं आरक्षण खाताय, असा दावाही त्यांनी केलाय. यावर भुजबळ यांनी काय केला पलटवार?

जालना, १७ नोव्हेंबर २०२३ : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळणार असं वारंवार म्हणताय. तर ओबीसी आमचं आरक्षण खाताय, असा दावाही त्यांनी केलाय. यावर भुजबळ यांनी पलटवार करत जोरदार निशाणा साधलाय. ओबीसी आरक्षण कुणी दिलं हे सांगत असताना भुजबळ म्हणाले, मंडल आयोगाने आरक्षण दिलं. तेव्हाही काही लोक कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयात ९ जज होते. माजी न्यायामूर्ती पीबी सावंतही त्यावेळी होते. यावेळी त्यांनी ओबीसींचा मुद्दा बरोबर असून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असं सांगितल्यानंतर ओबीसीत २०१ जातींचा समावेश केला. सुप्रीम कोर्टाच्य़ा शिक्क्यानिशी हा समावेश झाला. त्यानंतर मार्च १९९४ मध्ये त्यासंदर्भातील जीआर निघाला. तर वारंवार म्हटलं जातंय कुणाचं खाताय कुणाचं खाताय… तुझं खातोय का रे…? असे म्हणत छहन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना सवाल केलाय.

Published on: Nov 17, 2023 03:25 PM