Special Report | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना क्लीन चिट !

Special Report | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना क्लीन चिट !

| Updated on: Sep 09, 2021 | 8:57 PM

ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चर्चा अगदी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये झाली त्या घोटाळ्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.

ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चर्चा अगदी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये झाली त्या घोटाळ्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. मात्र, भुजबळ यांना सेशन कोर्टाने क्लिनचीट दिली असली तरी हायकोर्टात जाण्याची तयारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं आहे. तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा यामध्ये समावेश होता. मात्र आज छगन भुजबळांचं नावही या प्रकरणातून वगळण्यात आलं.