राज्यातील कांदा उत्पादकांसाठी अजित पवार गटाचा हा नेता भेटणार शरद पवार यांना; घेणार सल्ला

राज्यातील कांदा उत्पादकांसाठी अजित पवार गटाचा हा नेता भेटणार शरद पवार यांना; घेणार सल्ला

| Updated on: Aug 21, 2023 | 2:22 PM

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा चांगलाच आक्रमक झाला आहे. तर कांदा निर्यातीवरील कर वाढवल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. याचदरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना बंद मागे घेण्याचे आवाहन केलं आहे.

मुंबई : 21 ऑगस्ट 2023 | राज्यातील कांदा उत्पादकांना धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्याविरोधात आता कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला आहे. तर शेतकऱ्याने आता आक्रमक भूमिका घेत नाशिकसह १५ ते १६ बाजार समितीत कांदा निलाव बंद ठेवला आहे. तर केंद्र सरकारविरोधात शेतकरी आपला संपात व्यक्त करत आहेत. यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बंद मागे घ्यावा असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. त्याचदरम्यान या निर्णयावरून शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे. त्यापाठोपाठ आता यावरून अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, कांद्याच्या प्रश्नावर शरद पवार यांची भेट घेणार असून त्याचा यावर सल्ला घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर याचमुद्द्यावर आणखीन काय म्हटलं आहे भुजबळ यांनी पाहा हा व्हिडिओ…

Published on: Aug 21, 2023 02:22 PM