Sharad Pawar म्हणाले कोर्ट कचेरी करणार नाही अन् तेच काल आयोगात, कुणी साधला निशाणा?
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगात काल राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीला शरद पवार हे प्रत्यक्ष हजर असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगातील शरद पवार यांच्या उपस्थितीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी निशाणा साधला आहे.
नाशिक, ७ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगात काल राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीला प्रत्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले होते कोर्ट कचेरी करणार नाही आणि तेच आयोगात हजर होते, असे भुजबळ म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, गेली कित्येक वर्षांपासून आम्ही काम करतोय. पण आता आमच्यावर टीका करत आहेत. आमचे आदरणीय नेते, शरद पवारसाहेब म्हणाले होते कोर्ट कचेरी करणार नाही आणि तेच तिकडे निवडणूक आयोगात गेले होते. ते म्हणतात, मी राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे. पण मग मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही? माझ्याच बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं. त्यात आमचा पण खारीचा वाटा आहे की नाही?, असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना विचारला आहे.