छगन भुजबळ नाशिकमधून लढणार? शिंदे अन् भाजपच्या रस्सीखेचमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री

छगन भुजबळ नाशिकमधून लढणार? शिंदे अन् भाजपच्या रस्सीखेचमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री

| Updated on: Mar 27, 2024 | 12:00 PM

नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर होतांना दिसताय. नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता अजित पवार गटाची एन्ट्री झाली आहे.

नाशिकच्या जागेवरून शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजप नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद झालेत. नाशिकमध्ये महायुतीमधील दोन नेतेच आमने-सामने आलेत. मात्र असं असलं तरी ही जागा शिंदे किंवा भाजपऐवजी दादांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर होतांना दिसताय. नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता अजित पवार गटाची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे दादांची मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकमध्ये अजित पवार गटाकडून भुजबळ लढण्याची शक्यता आहे. नाशिकमधून छगन भुजबळांना का तिकीट मिळू शकतं? छगन भुजबळ हे ओबीसी नेते असून देशपातळीवर त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करता येईल. नाशिकमधून भुजबळांना उमेदवारीची रणनिती काय असू शकते? बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 27, 2024 12:00 PM