Sharad Pawar On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ संपर्कात आहे की नाही? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…
छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आणि त्यांचा सध्याच्या एकंदर भूमिकेमुळेच ते शरद पवार गटासोबत पुन्हा जाणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा, याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, शरद पवार म्हणाले...
मी राष्ट्रवादी सोबत आहे, अजित दादांसोबत नाही, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आणि त्यांचा सध्याच्या एकंदर भूमिकेमुळेच ते शरद पवार गटासोबत पुन्हा जाणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा, याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. छगन भुजबळ यांच्या या विधानामागची पार्श्वभूमी काय हे मला माहीत नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानबद्दल मला काही माहीत नाही असे शरद पवार म्हणाले. त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आधी लोकसभा आणि त्या नंतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. याच दरम्यान, त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भुजबळ नेमकं कोणतं पाऊल उचलणार? याबद्दल चांगलेच तर्क-वितर्क सुरू आहेत.