छगन भुजबळ यांच्या होमपीचवरच बसणार फटका? की विजय चौका? यंदा येवल्यात रिस्क?
तब्बल ३० वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधातच दंड थोपटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आणि मराठा नेते एकमेकांसमोर आलेत. लढाई फक्त आरक्षणापुरती राहिली नाही तर संख्याबळावरून दिले पाडापाडीचे इशारे
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : तुम्ही आमचे एक छगन भुजबळ पाडले तर आम्ही तुमचे १६० मराठा आमदार पाडणार, असा इशारा ओबीसी समाजातील नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी दिला आहे. यावरून दोन्ही बाजूने इशारे आणि आव्हानं दिली जात आहेत. मात्र याचा फटका मंत्री छगन भुजबळ यांना येवल्यात बसणार का? की विजयाची परंपरा कायम ठेवणार…? मंडल आयोगानंतर तब्बल ३० वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधातच दंड थोपटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आणि मराठा नेते एकमेकांसमोर आलेत. लढाई फक्त आरक्षणापुरती राहिली नाही तर संख्याबळावरून पाडापाडीचे इशारे दिले जाताय. तर सरते शेवटी दोन्ही बाजूच्या विधानांनी राजकीय आरक्षणाला फाटे फुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट..
Published on: Nov 24, 2023 12:20 PM
Latest Videos