'मातोश्रीची भाकरी अन् पवारांची चाकरी', असं दादा भूसे यांनी म्हणताच अजित पवार भडकले

‘मातोश्रीची भाकरी अन् पवारांची चाकरी’, असं दादा भूसे यांनी म्हणताच अजित पवार भडकले

| Updated on: Mar 21, 2023 | 11:10 PM

VIDEO | दादा भूसे सभागृहात संजय राऊत यांच्यावर बोलले, पण अजित पवार का भडकले? बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बऱ्याचदा कोणत्या न कोणत्या विषयावरून चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला आहे. मंत्री दादा भूसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना शरद पवार यांचा उल्लेख केला मात्र अजित पवार चांगेलच भडकल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत नेमकं काय घडलं…’भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवार यांची करतात’, असे वक्तव्य दादा भूसे यांनी केले आणि विधानसभेच एकच गदारोळ झाला. यानंतर अजित पवार आक्रमक होत त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख का केला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. तर अजित पवार दादा भूसे यांच्यावर आरोप करताना ते म्हणाले तुम्ही शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला मात्र दादा भूसे म्हणाले मी एकेरी उल्लेख केला नसून माझं वक्तव्य हे संजय राऊत यांना होतं.

Published on: Mar 21, 2023 11:10 PM