जरांगेंनी थोडा संयम ठेवावा, ती मागणीही पूर्ण होणार; दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर आणि आंदोलनावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षण मुद्दा होता, अडीच कोटी लोकांचं एवढं मोठं सर्वेक्षण केलं आणि आरक्षण विधेयक मंजूर केलं. या आनंदात मनोज जरांगे यांनी सहभागी व्हायला हवं होतं
मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे यांच्या तब्यतेची सगळ्यांना काळजी वाटते त्यामुळे त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन करत मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर आणि आंदोलनावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षण मुद्दा होता, अडीच कोटी लोकांचं एवढं मोठं सर्वेक्षण केलं आणि आरक्षण विधेयक मंजूर केलं. या आनंदात मनोज जरांगे यांनी सहभागी व्हायला हवं होतं. तर सगेसोयरे कायद्याबद्दल आक्षेप आले आहेत, त्यावर विचार सरकारला करावा लागणार आहे. नाहीतर कोर्टात पुन्हा ते टिकणार नाही. सगळी प्रक्रिया याबाबत पूर्ण करावी लागते. मुख्यमंत्री या सगळ्याबद्दल संवेदशील आहेत. थोडे दिवस जरांगे पाटील यांनी थांबावं तुमची कुणबी दाखल्याची मागणीसुद्धा पूर्ण होईल, असे म्हणत केसरकर यांनी जरांगे पाटील यांना आश्वस्त केल्याचे पाहायला मिळाले.