मालवणमधील पुतळ्याच्या घटनेवरून दीपक केसरकर काय बोलून गेले, 'वाईटातून चांगलं घडेल...'

मालवणमधील पुतळ्याच्या घटनेवरून दीपक केसरकर काय बोलून गेले, ‘वाईटातून चांगलं घडेल…’

| Updated on: Aug 28, 2024 | 11:53 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य संतापजनक आहे. आधीच मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं रोष आहे. त्यातच वाईटातून काही चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला, असं दीपक केसरकर म्हणतायत. बघा स्पेशल रिपोर्ट

मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याची महाराजांचा पुतळा कोसळल्यानं रोष असताना, मंत्री केसरकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. वाईटातून काही चांगलं घडायचं असेल, असं केसरकर म्हणालेत. दरम्यान, पुतळ्यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलर्ट देणाऱ्या पत्रानंतर आणखी सवाल उपस्थित झालेत. गेल्या वर्षी 4 डिसेंबरला नौदलच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र 8 महिने 22 दिवसांत 28 फूट उंचीचा पुतळा पडला. आता 100 फूटांचा पुतळा उभारुन पुन्हा मोदींना बोलावू असं केसरकरांचं म्हणणंय. कोसळलेला महाराजांचा पुतळा शिल्पकार जयदीप आपटेनं तयार केला होता. त्याच्यासह स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. शिल्पकार आपटेला फक्त 3-4 पुतळेच बनवण्याचा अनुभव होता. तरीही आपल्याला काम मिळालं हे त्यानं, सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीतच म्हटलंय. उद्धघटनाआधीच, आपटेनं मुलाखतीतून जे काही सांगितलं ते धक्कादायकच आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 28, 2024 11:53 AM