शिवरायांचा पुतळा कोसळला अन् 'त्या'  वक्तव्यावरून घमासान, दीपक केसकरांचं डोकं ठिकाणावर आहे का?

शिवरायांचा पुतळा कोसळला अन् ‘त्या’ वक्तव्यावरून घमासान, दीपक केसकरांचं डोकं ठिकाणावर आहे का?

| Updated on: Aug 28, 2024 | 10:53 AM

महाराज यांचा पुतळा तुकड्या-तुकड्या रूपात कोसळलेला पाहून लोकांचं रक्त खवळलं आहे. तप यावर बोलताना महाराष्ट्राच्या शिक्षणखात्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी संतापजनक वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचंच काम केलं असल्याचे बोलले जात आहे. बघा नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात संतापजनक स्पष्टीकरण देत आणखी वाद वाढवला आहे. ‘ही कदाचित नियती असेल, शिवरायांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. वाईटातून चांगलं घडायचं असेल.’, अशी शरम आणणारी सारवा-सारव मंत्री दीपक केसरकर यांनी केल्याचे पाहायला मिळाले. हे सुद्धा एक दोन वेळा नव्हे तर चार वेळा… यासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले, वाईटातून चांगलं काहीतरी घडेल, या दुर्घटनेतून काही चांगलं घडेल, ही कदाचित नियती आणि शिवरायांची इच्छा आणि वाईटातून चांगलं घडावं, म्हणून हा अपघात घडला असावा, अशी चार विधानं दीपक केसरकर यांनी केली. या घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना वारे ताशी ४५ किमी वेगाने वाहत असल्याचे सांगितले तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खाऱ्या वाऱ्यांमुळे स्टीलला गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला असावा. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 28, 2024 10:53 AM