Deepak Kesarkar : ... तर आज ही वेळ आली नसती, दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना काय दिला सल्ला?

Deepak Kesarkar : … तर आज ही वेळ आली नसती, दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना काय दिला सल्ला?

| Updated on: Oct 15, 2023 | 10:56 AM

VIDEO | उद्धव ठाकरे यांना कुणासोबतही युती करण्याचा अधिकार आहे. पक्षांतील लोकांना सांभाळलं असतं तर ही वेळ आली नसती, असे म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर स्वतःच्या पक्षातील सहकारी जर सांभाळले असते तर आज ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | उद्धव ठाकरे यांना कुणासोबतही युती करण्याचा अधिकार आहे. पक्षांतील लोकांना सांभाळलं असतं तर ही वेळ आली नसती, असे म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. दीपक केसरकर म्हणले, कुणाबरोबर जावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. स्वतःच्या पक्षातील सहकारी जर सांभाळले असते तर आज ही वेळ आली नसती. इतर पक्षांना सोबत घेण्याची काही आवश्यकता भासली नसती, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलाय. एकत्र युती अनेक वर्ष राज्यावर राज्य करू शकली असती. ज्यावेळी पॉलिटिकल ऍडजस्टमेन्ट केली जाते तेव्हा ती राज्य जास्त काळ टिकत नाहीत आणि जनतेची सेवाही करू शकत नाही. त्यामुळे राज्याला एक स्थिर सरकारची आवश्यकता आहे आणि ते केवळ युतीच देऊ शकते, असेही ते म्हणाले.

Published on: Oct 15, 2023 10:55 AM