बीडमध्ये लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही धनंजय मुंडेंची शिफारस; मोठा खुलासा
बीडमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेल्या वाल्मिक कराडचं अध्यक्षपद अद्याप कायम आहे. इतकंच नाहीतर धक्कादायक म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराड याच्या नावाची शिफारस केली होती
बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच वाल्मिक कराडसंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बीडमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेल्या वाल्मिक कराडचं अध्यक्षपद अद्याप कायम आहे. इतकंच नाहीतर धक्कादायक म्हणजे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्या राजीनाम्याची गेल्या एक महिन्यांपासून मागणी करण्यात येत आहे त्या मंत्री धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराड याच्या नावाची शिफारस बीडमध्ये लाडकी बहीण योजनेचा अध्यक्षपदासाठी केली होती. दरम्यान, वाल्मिक कराड याच्यावर १४ गुन्हे दाखल असून त्याला बीडमध्ये लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद देण्यात आल्याचा मोठा खुलासा आता समोर येत आहे. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.