पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत… नेमकं कारण काय?
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यावरून बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा दबाव वाढला. त्यामुळेच नरेंद्र मोदी मुंबईत येण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांना भेटून धनंजय मुंडे परळीत?
पतंप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबई दौऱ्यावर होते. महायुतीतील तिनही पक्षांचे आमदार आणि मंत्र्यांना त्यांनी संबोधित केलं. पण अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे परळीत गेले. मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे हे परळीत का गेले? यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यावरून बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा दबाव वाढला. त्यामुळेच नरेंद्र मोदी मुंबईत येण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांना भेटून धनंजय मुंडे परळीला निघून गेलेत, अशी चर्चा सुरू झाली. तर अजित पवारांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडे यांना विचारणा केल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि आंदोलन करण्यात आलं. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करताना हिंसक वळण लागलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…