Dhananjay Munde : राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग
मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. धनंजय मुंडे हे अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसाच्या ताब्यात आले नसल्याने या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून एसआयटी पथकाच्या हालचाली वेगवानपद्धतीने सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एवढंच नाही तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत असल्याचाही आरोपही यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे विरोधकही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आग्रही आहे. अशातच मोठी बातमी समोर येत आहे, मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी मुंडे दाखल झाले असून दोघांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेमका कोणता निर्णय घेणार धनंजय मुंडे घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.