Dhananjay Munde Video : ‘… त्यावर मला काही बोलायचं नाही’; राजीनामा अन् वारंवार होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडे थेट म्हणाले….
'गेल्या 53 दिवसांपासून माझ्यावर संकट आहे, सोशल मीडियातून टार्गेट करून मीडिया ट्रायल सुरू आहे. देशमुखांची हत्या झाली त्यातील आरोपींना फाशी द्या', धनंजय मुंडे बघा काय म्हणाले?
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर आणि करण्यात येणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भगवानगड त्यांच्या पाठिशी असल्याचे म्हणाले. दरम्यान, यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिकाही मांडली. ‘एक लक्षात घ्या. हे संकट आज आलेलं नाही. ५३ दिवसांपासून पाहत आहात. सोशल मीडियातून टार्गेट करून मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यात कुठेही मी तीन महिन्यात एक अवाक्षर शब्द बोललो नाही. ५३ दिवसात कधीही इथे आलो असतो. पण त्या भावनेतून नाही, मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर आलं पाहिजे या हेतूने आलो’, असे मुंडे म्हणाले. तर जे प्रकरण घडलं. ते ५३ दिवस सुरू आहे. यात सर्व गोष्टी आल्या आहेत. आमचंही स्पष्ट म्हणणं आहे की, देशमुखांची हत्या झाली त्यातील आरोपींना फाशी द्या. फास्ट ट्रॅकवर केस आणा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. यात जे कोणी सापडेल त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसांपासूनची भूमिका आहे. ही भूमिका मांडल्यावर काही लोक राजकारण करत असतील, केवळ माझा राजीनामा घेण्यासाठी राजकारण आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फासावर लटकवण्यासाठी राजकारण आहे. एका समाजाला, मला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार आहे. पण जे कोणी दोषी असतील त्यांना फासावर लटकवा हे माझं मत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज

CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप

'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका

विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
