राऊत यांच्या दंगलीच्या कटाच्या दाव्यावर भाजप नेत्याचा पलवार; म्हणाला, ‘हा प्रयत्न विरोधकांडूनच’
यावेळी त्यांनी मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट असल्याची घणाघाती टीका भाजपवर केली. तसेच संभाजी भिडे यांच्या वादग्रसेत विधानावरून देखील टीका करताना, भाजपचे काही गुरुजी मंडळी राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला.
पुणे, 06 ऑगस्ट 2013 | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट असल्याची घणाघाती टीका भाजपवर केली. तसेच संभाजी भिडे यांच्या वादग्रसेत विधानावरून देखील टीका करताना, भाजपचे काही गुरुजी मंडळी राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. यावरून मंत्री गिरिष महाजन यांनी राऊत यांच्यावर निशाना साधताना टीका केली आहे. यावेळी महाजन यांनी, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, की याबाबत विरोधकच तसा प्रयत्न करत आहेत. तेच आगीत तिळ टाकायचं काम करत आहेत. तर शासनाला कसे बदनाम करता येईल याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून केला जात आहे. तर विरोधकांच्याकडून मतांचे राजकारण देखील करण्यासाठी हे केलं जात असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.