मनोज जरांगे पाटील यांनी 'ते' रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसे यांनी पुन्हा गिरीश महाजन यांना डिवचलं

मनोज जरांगे पाटील यांनी ‘ते’ रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसे यांनी पुन्हा गिरीश महाजन यांना डिवचलं

| Updated on: Dec 17, 2023 | 12:00 PM

मंत्री गिरीश महाजन यांचे रेकॉर्डिंग व्हायरल करणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटल्याप्रमाणे अधिक वेळ न घालवता गिरीश महाजन यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला कळू द्या, असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलंय

जळगाव, १७ डिसेंबर २०२३ : जळगावातील मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे नेहमीच एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशातच मंत्री गिरीश महाजन यांचे रेकॉर्डिंग व्हायरल करणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटल्याप्रमाणे अधिक वेळ न घालवता गिरीश महाजन यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला कळू द्या, असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलंय. दरम्यान मुदतीत आरक्षणाबाबत निर्णय झाल्यास गिरीश महाजन यांनी आपल्या सोबत केलेल्या चर्चेचे रेकॉर्डिंग व्हायरल करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अधिक वेळ न घालवता नेमका मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांचा संदेश घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Published on: Dec 17, 2023 12:00 PM