शरद पवार कृषीमंत्री असताना काय दिवे लावले? मोदींवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर कुणाचा पलटवार?
शरद पवार इतके वर्ष राज्यांमध्ये होते तेव्हा काय चाललं होतं पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा थेट सवाल गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी काय दिवे लावले..
जळगाव, ७ मार्च २०२४ : राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय, हीच का मोदी गॅरंटी असे म्हणत शरद पवार यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर टीका केली होती. यावर भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, शरद पवार इतके वर्ष राज्यांमध्ये होते तेव्हा काय चाललं होतं पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा थेट सवाल गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी काय दिवे लावले, असा खोचक टोलाही गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना लगावला. मोदींची गॅरंटी मतदारांना आणि जनतेला माहिती आहे. शरद पवारांनी त्यांचे माणसं सांभाळावे आणि लोकसभेचे खातं उघडावं, असं आव्हानही महाजन यांनी दिलं आहे. लोक मोदींची गॅरंटी पाहत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी पवारांवर टीका केली आहे.