Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच? 10 मंत्रिपद वाढणार; मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होणार आहे. याबाबतक सुरू असणाऱ्या चर्चांना आता पुर्ण विराम लागणार असून 10 जणांचा आता मंत्री मंडळात समावेश होणार अशी खात्री दायक माहिती भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नाशिक : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होणार आहे. याबाबतक सुरू असणाऱ्या चर्चांना आता पुर्ण विराम लागणार असून 10 जणांचा आता मंत्री मंडळात समावेश होणार अशी खात्री दायक माहिती भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते नाशिक येथे बोलत होते. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रडखडलेला आहे. सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणकोणत्या आमदारांना संधी दिली जाईल, याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. याचदरम्यान आता मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटलं आहे. तर दोन पक्ष असल्यामुळे नावांविषयी आणि खात्यांविषयी चर्चा होत असते. पण या सर्व चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच यावर निर्णय होईल. तर शिवसेनेतून कोणाला संधी मिळणार याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील. भाजपमध्ये तर कुणाला मंत्री करायचं कुणाला काढायचं हा निर्णय भाजपचा आहे. त्यामुळे एकमेकांच्या पक्षामध्ये लक्ष देण्याची गरज नाही. अजूनच जवळपास दहा मंत्री वाढतील. त्यामध्ये कुणाचाही नंबर लागू शकतो असेही ते म्हणाले.