Gulabrao Patil | भान हरवलेले नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे

Gulabrao Patil | भान हरवलेले नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे

| Updated on: Aug 24, 2021 | 7:48 AM

माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे. मात्र, हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे, अशी टीका शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.