राजीनाम्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील भडकले अन् पत्रकारांनाच केला ‘हा’ सवाल
VIDEO | त्या 5 मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यावरचं राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार? गुलाबराव पाटील भडकले...
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह 5 मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यावरचं राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार हे भाजपच्या हाय कमांडचे आदेश आहेत. या चर्चेला राजकीय वर्तुळात सध्या उधाण आलंय. याचं विषयावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील हे पत्रकारांवरचं भडकले आणि त्यांनी पत्रकारांनाच थेट सवाल विचारला, मला माहिती नाही तुम्ही पाहिलं का? असा प्रतिसवाल करत गुलाबराव पाटील यांनी काढता पाय घेतला. जळगाव जिल्हा नियोजन समितीतून पोलिसांना 127 वाहने हस्तांतर करण्याच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील उपस्थित होते.
Published on: Jun 13, 2023 04:50 PM
Latest Videos