एकनाथ खडसे भाजपात येणार? शिंदेंच्या मंत्र्यानं थेट सांगितलं ठिकाण अन् तारीख
एकनाथ खडसे यांचा चंद्रपूरमध्ये 9 एप्रिल रोजी भाजमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांना मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असं वक्तव्य करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाच्या मुहूर्तावर मोठे संकेत दिले आहेत. बघा नेमकं काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांचा चंद्रपूरमध्ये 9 एप्रिल रोजी भाजमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांना मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असं वक्तव्य करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाच्या मुहूर्तावर मोठे संकेत दिले आहेत. तर विदर्भातून ते आपल्या खान्देशात येतील अशी माहिती असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही त्यांचे स्वागत करतो की ते मूळ विचारधारांमध्ये येत आहेत. जिल्ह्यात निश्चित आम्ही त्याचे स्वागत करू. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नाही कहते. जिल्ह्यात भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून त्यांचे ओळख होती. मंत्री म्हणून ओळख होती. मात्र त्यांनी विचारधारा सोडल्यामुळे बऱ्याच वेळा टीका सुद्धा केली. मात्र आता मागच्या काळात जे झालं ते आम्ही विसरून जाऊ आणि नव्याने अध्याय सुरू करू, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावरून एकनाथ खडसे मोदींच्या चंद्रपूर येथील सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.