‘मला महिनाभर शिव्या खायच्या अन् मी खाणार’, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चा
'लोकांना त्रास होत असेल तर लोक शिव्या देणारच आहे मात्र शिव्या ऐकण्याची मानसिकता ही पुढाऱ्यांमध्ये असली पाहिजे. लोकांनी आपल्याला मत दिलं आहे. त्यामुळे आपली सुद्धा जबाबदारी आहे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तर पाच वर्ष शिव्या खाल्ल्या तर आणखी एक महिने शिव्या खाल्ल्या तर काय फरक पडतो'
जळगाव, १० जानेवारी २०२४ : मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून नागरिक गेल्या पाच वर्षांपासून शिव्या देत आहे अजून एक महिना नागरिकांच्या शिव्या ऐकायच्या आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. जळगावातील धरणगावात संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी भाषणात ते बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले की, लोकांना त्रास होत असेल तर लोक शिव्या देणारच आहे मात्र शिव्या ऐकण्याची मानसिकता ही पुढाऱ्यांमध्ये असली पाहिजे. लोकांनी आपल्याला मत दिलं आहे. त्यामुळे आपली सुद्धा जबाबदारी आहे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तर पाच वर्ष शिव्या खाल्ल्या तर आणखी एक महिने शिव्या खाल्ल्या तर काय फरक पडतो. महिनाभरानंतर धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर लोकांच्या शिव्या बंद होतील असं सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.