जळगाव हे ‘जलने वाला भी है, और जल वाला भी है’, असं गुलाबराव पाटील का म्हणाले?
VIDEO | ... तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केलाच नसता, गुलाबराव पाटील थेटच सांगितलं
जळगाव : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने अखेर दिला. यानंतर सरकार स्थिर होईल, असे चित्र दिसतंय. विरोधक सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार अशी टीका करत होते. यावर शिवसेनेचे आमदार आणि मंत्री गुलाबराब पाटील यांनी विरोधकांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावत होते. चार-पाच मंत्री देखील त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्र्यांच्या मनात जर निकालाची भीती असती तर त्यांनी दौरे केले नसते. मुख्यमंत्री जळगावमध्ये आल्यानंतर सगळं चांगलं होत असतं, असंही मिश्किलपणे गुलाबराव पाटील म्हणाले. सत्ता संघर्षाच्या आधीही सरकार हे स्थिर होतं आणि आताही स्थिर आहे. कोणताही निकाल म्हटलं की भीती असतेचं. दरम्यान, शिंदे हे जळगावात आल्यावर प्रगती होते, असा प्रश्न त्यांना विचारला असता. ते म्हणाले, जळगाववाल्यांचा आशीर्वाद हा चांगला आहे, हे जळगाव आहे जलने वाला भी है और जल वाला भी है…असे म्हणत त्यांनी विरोधकांना खोचक टोलाही लगावला. एक प्रकारे सरकारवर किती संकट असली तरी मुख्यमंत्री जर जळगावत आले तर सगळं चांगलं होतं, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.