शिवसेनेच्या मंत्र्यानं संजय राऊत यांच्या वडिलांचं नाव घेत दिलं प्रत्युत्तर, काय केला एकेरी उल्लेख?

शिवसेनेच्या मंत्र्यानं संजय राऊत यांच्या वडिलांचं नाव घेत दिलं प्रत्युत्तर, काय केला एकेरी उल्लेख?

| Updated on: Sep 30, 2023 | 4:53 PM

VIDEO | संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या 'त्या' टीकेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा थेट काढला बाप अन् एकेरी शब्दात उल्लेख करत गुलाबराव पाटील यांनी दिलं संजय राऊत यांना प्रत्युत्तर, बघा प्रत्युत्तर

जळगाव, ३० सप्टेंबर २०२३ | शिवसेना ही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी स्थापन केली होती का? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाप काढल्याने शिवसेनेचे नेते चांगलेच भडकले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेना ही संजय राऊत यांचे वडील राजाराम राऊत यांनी स्थापन केली आहे का? असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांना दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी शिवसेना केली होती का? गेल्या वर्षी शिवाजी पार्क येथे आमचा दसरा मेळावा झाला होता आणि यंदाही तो होणार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

Published on: Sep 30, 2023 04:53 PM