मराठा आंदोलनाचा फटका राजकीय नेत्यांना… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची मुंबईत तोडफोड

| Updated on: Nov 01, 2023 | 11:46 AM

राज्यात मराठा आंदोलनावरून वातावरण सध्या चांगलंच पेटलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असणाऱ्या आंदोलनाची झळ आता थेच राज्यातील मंत्र्यांना बसतेय. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात

Follow us on

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | राज्यात मराठा आंदोलनावरून वातावरण सध्या चांगलंच पेटलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असणाऱ्या आंदोलनाची झळ आता थेच राज्यातील मंत्र्यांना बसतेय. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात इसमाने हसन मुश्रीफांच्या वाहनाच्या काचा फोडल्याचे पाहायला मिळाले. हा हल्ला केल्याप्रकरणी दोन अज्ञात इसम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आकाशवाणी आमदार निवासात हसन मुश्रीफ यांची गाडी पार्क करण्यात आली होती. यावेळी आज अज्ञातांकडून हसन मुश्रीफ यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय. यासह छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.