कोल्हापुरात किरीट सोमय्या दाखल झाले तर त्यांना हिसका दाखवणारच, मुश्रीफ समर्थकांचा इशारा

कोल्हापुरात किरीट सोमय्या दाखल झाले तर त्यांना हिसका दाखवणारच, मुश्रीफ समर्थकांचा इशारा

| Updated on: Sep 19, 2021 | 9:54 PM

भाजप नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाले आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविरास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी त्यांना कोल्हापुरात येण्याचं आव्हान दिलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाले आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविरास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी त्यांना कोल्हापुरात येण्याचं आव्हान दिलं आहे. दुसरीकडे सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले तर कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापुराला येण्यास मज्जाव केलाय. याबाबतची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना पाठवली आहे. पण त्या नोटीसला न जुमानता ते कोल्हापुरला निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही घडामोडी घडताना दिसत आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि मुश्रीफ समर्थक एकत्र जमले आहेत. त्यांनी सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले तर त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा दिला आहे.

Published on: Sep 19, 2021 09:51 PM