महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या बड्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'निकालानंतर गरज पडल्यास...'

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या बड्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, ‘निकालानंतर गरज पडल्यास…’

| Updated on: Nov 21, 2024 | 12:01 PM

गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेणार आणि सरकार स्थापन करणार, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनंतर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि महायुती सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आगामी सत्ता स्थापनेबाबत मोठं वक्तव्य केले आहे. गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेणार आणि सरकार स्थापन करणार, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनंतर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 10 ते 15 अपक्ष आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलने अपक्ष आमदाराबाबत केलेल्या दाव्यानुसार गरज पडल्यास सत्तास्थापनेसाठी महायुती अपक्षांची मदत घेणार, असे दीपक केसरकर म्हणाले. ‘आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतो आणि तसं नाही झालं तर अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, असं दीपक केसरकर म्हणाले. पुढे त्यांनी असंही सांगितलं की, विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये अपक्षांना १० ते १५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.’ दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असल्याचं दिसून आले आहे. 10 ते 15 अपक्ष आमदार निवडून येण्याची शक्यता असल्याने निवडून येणाऱ्या अपक्ष आमदारांचे वजन चांगलेच वाढणार असल्याची शक्यता आहे.

Published on: Nov 21, 2024 12:01 PM