Jitendra Awhad | म्हाडाच्या परीक्षांबाबत अफवा पसरवल्या जातायेत : जितेंद्र आव्हाड
म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कुणालाही पैसे देऊ नका. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार आहे, असं सांगतानाच अफवा अशाच सुरू राहिल्या तर वेळ आल्यास मीच ही परीक्षा रद्द करेन, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कुणालाही पैसे देऊ नका. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार आहे, असं सांगतानाच अफवा अशाच सुरू राहिल्या तर वेळ आल्यास मीच ही परीक्षा रद्द करेन, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. यावेळी त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन करताना हातजोडून अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट करून हे आवाहन केलं आहे. 12 तारखेला होणाऱ्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात आहे. काही लोक पैसेही घेत आहेत असं ऐकायला आलं. असं जर कोणी रंगेहाथ पकडून दिलं तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पोलिसांमध्ये दिलं जाईल आणि गुन्हे दाखल केले जातील. कृपया विद्यार्थ्यांना कुणालाही पैसे देऊ नका, असं आव्हाड यांनी सांगितलं.