Narhari Zirwal : फाडूनिया छाती ‘पुन्हा’ दाविले पवार, ‘बजरंगाच्या छातीत श्रीराम तर माझ्या छातीत..’, झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
पवार कुटुंबातील वाद संपून दोघांना एकत्र येऊदे.. असं साकडं अजित पवार यांच्या आईंनी विठ्ठलाच्या चरणी घातलं. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर दोन्ही एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया भाजप आणि अजित पावर यांच्या गोटातून आली. यामध्ये सर्वांत रंजक प्रतिक्रिया नरहरी झिरवाळांनी दिली.
पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्याकडे परतणाऱ्या नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा आपल्या मनात, छातीत पवार असल्याचेच म्हटले आहे. याला निमित्त होतं ते म्हणजे अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठुरायाला घातलेल्या साकड्याचं… पवार कुटुंबातील वाद संपून दोघांना एकत्र येऊदे.. असं साकडं अजित पवार यांच्या आईंनी विठ्ठलाच्या चरणी घातलं. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर दोन्ही एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया भाजप आणि अजित पावर यांच्या गोटातून आली. यामध्ये सर्वांत रंजक प्रतिक्रिया नरहरी झिरवाळांनी दिली. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांसोबत झिरवळ होते. त्यावेळी आपल्याला काहीच माहिती नव्हतं. उपहरण करून मला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं, असा दावा झिरवळ यांनी केला. यावेळी ते म्हणाले, माझी छाती फाडली तरी आता शरद पवार साहेबच दिसतील. बजरंगाच्या छातीत प्रभू श्री राम दिसले होते. तशी माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील. ते पुढे असेही म्हणाले, मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं, याच मूल्यांकन मीच करू शकतो, असेही ते म्हणाले.