केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवाला पुन्हा धोका, कुणी केला धमकीचा फोन?
VIDEO | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कुणाचा वॉच? पुन्हा एकदा दिली जीवे मारण्याची धमकी अन् पोलीस यंत्रणा झाली अलर्ट
नागपूर : गेल्या आठवड्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ब्लॅकमेलिंगचं प्रकरण समोर आलं असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन आले. आज सकाळी गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन फोन आले असल्याची माहिती समोर आली. एवढंच नव्हे तर धमकी देणाऱ्याने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्याने स्वतःचं नाव जयेश पुजारी असल्याचं म्हटलं आहे. पुन्हा एकदा जयेश पुजारी याच्या नावाने धमकीचे फोन आल्याने पोलीस यंत्रणांना अलर्ट झाली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. दोन महिन्यांपूर्वीदेखील नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा अलर्ट झाली होती. मात्र त्या प्रकारात कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं निष्पन्न झालं होतं.