राजकीय पक्ष आणि विचारांचा… सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या
नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य केले आहे. राजकीय पक्ष आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध हा निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. तर देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सर्वच क्षेत्रातील समस्या आहे.
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : राजकारणात सर्वच आमदार-खासदार सर्रासपणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य केले आहे. राजकीय पक्ष आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध हा निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. तर देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सर्वच क्षेत्रातील समस्या आहे, असे मिश्कील भाष्य करत त्यांनी परखड मत व्यक्त केले आहे. पार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे ‘लोकमान्य गप्पा’ हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राजकीय नेते मंडळींना कानपिचक्या दिल्या.