Special Report | मंत्री Bacchu Bhau यांचा पोलिसांना इशारा?-TV9
आता सत्तेत सहभागी झाल्यानंतरही बच्चू कडू यांचा आक्रमक आणि सामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव कायम आहे. कधी ते पेहराव बदलून सरकारी कार्यालयातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणतात. तर कधी अधिकाऱ्याला ते जनतेचे सेवक असल्याची जाणीव करुन देत असतात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
अमरावती : शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, गरीबांच्या प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू कायमच आक्रमक असतात. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी बच्चू कडू यांची आंदोलनं हा राज्यातील चर्चेचा विषय असायचा. तसंच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या आंदोलनाची दखल घेणं भाग असायचं. आता सत्तेत सहभागी झाल्यानंतरही बच्चू कडू यांचा आक्रमक आणि सामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव कायम आहे. कधी ते पेहराव बदलून सरकारी कार्यालयातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणतात. तर कधी अधिकाऱ्याला ते जनतेचे सेवक असल्याची जाणीव करुन देत असतात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. एका शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याचं कळताच कडू यांनी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याला चांगलंच झापलं. बच्चू कडू आणि त्या पोलिस अधिकाऱ्यातील हा संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.