Sangali | लवकरच शेतकऱ्यांना मोठं पॅकेज देऊ, विश्वजित कदम यांचे आश्वासन
लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजित कदम यांनी दिले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे.
सांगली : महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजित कदम यांनी दिले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे. कोल्हापूरसह सांगलीची जनताही मदतीच्या अपेक्षेत आहेत. आज कोल्हापूरला मुख्यमंत्री आले आहेत. पण सांगलीला येऊ शकले नाहीत. यावर मंत्री विश्वजित कदम म्हणाले येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी येतील.
Latest Videos