‘एखाद्या संघटनेने त्याला विरोध केला म्हणजे’; दूध दरवाढीवरून महसूलमंत्र्याचा शेट्टी आणि खोत यांना टोला
त्याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. तर तर सोबतच ही दूध दरवाढ फसवी आहे असा आरोप शेतकरी संघटनांकडून होता. तसेच या दूध दरवाढीला विरोध केला होता.
अहमदनगर, 01 ऑगस्ट 2023 | राज्यात झालेल्या दूध दरवाढीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी जोरदार विरोध केला होता. त्याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. तर तर सोबतच ही दूध दरवाढ फसवी आहे असा आरोप शेतकरी संघटनांकडून होता. तसेच या दूध दरवाढीला विरोध केला होता. त्यावरून कोणीही राजकारण करू नये असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. याचबरोबर दूध दरवाढीच्या निर्णयाचे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी स्वागत केल आहे. एखाद्या संघटनेने त्याला विरोध केला म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला असं होत नाही. अशा संघटनेचे सर्वच सदस्य हे शेतकरी नाहीत असं दोखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच येत्या काळात पशुखाद्याचे दर हे कमी करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिले आहेत असेही मंत्री विखे म्हणाले.