जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, राज्य सरकारमधील बड्या मंत्र्यानं केली एकच विनंती
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या या एल्गारानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. इतकंच नाहीतर यावेळी एक विनंतीही केली.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे. 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या या एल्गारानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे की ओबीसीतून आरक्षण द्या, सग्या सोयऱ्यांची अंलबजावणीचा मुद्दा आहे, मात्र सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं आहे आणि ते कायदेशीर टिकलं आहे. सरकारची भूमिका मराठ्यांना आरक्षण देताना कायम सकारात्मक राहिली आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस मागच्या काही काळात मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल योग्य भूमिका घेतली. मात्र मराठा आरक्षण महाविकास आघाडीने घालण्याच पाप महाविकास आघाडीने केलं’, असे राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटलं आणि मविआवर हल्लाबोल केला. दरम्यान, पुन्हा आंदोलन करण्यापेक्षा नवीन सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिला पाहिजे, अशी विनंती राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे.
![जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Manoj-Jarange-1.jpg?w=280&ar=16:9)
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
![भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Raj-Thackeray4.jpg?w=280&ar=16:9)
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
![पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय? पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/New-Project-43.jpg?w=280&ar=16:9)
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
![एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Eknath-Shinde-displeased.jpg?w=280&ar=16:9)
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
![दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/DHUKE.jpg?w=280&ar=16:9)