बाळासाहेब थोरात खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती; कुणी लगावला टोला?
VIDEO | राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरात यांना टोला
सातारा : बाळासाहेब थोरात आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. मी ज्यावेळी काँग्रेस सोडून गेलो त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना केली होती, एकटा खिंड लढवणार, ते आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार आहेत हे त्यांनाच माहिती, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. बाळासाहेब थोरात भाजपामध्ये आलेच तर माझा विरोध असायचा कारण नाही, त्याबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल, त्या निर्णयाला अधीन राहून आम्ही काम करू, असही ते म्हणाले. ते कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठच्या दिक्षांत समारभासाठी कराड येथे आले होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्यक केले.
Published on: Feb 10, 2023 03:35 PM
Latest Videos