रामदास आठवले यांच्या भाजपकडे ‘या’ तीन मोठ्या मागण्या, वक्तव्याची होतेय चर्चां
VIDEO | भाजपकडे रामदास आठवले यांनी नेमक्या कोणत्या तीन मागण्या मांडल्या?
नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे तीन मोठ्या मागण्या केल्याचे समोर आहे आहे. लोकसभा निवडणुकीत दोन तर विधानसभेच्या तीन जागा मिळाव्यात. अशी मोठी मागणी आहे तर यासह मंत्रिमंडळ विस्तारात १ मंत्रिपद मिळावं, असं देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहेत तर लोकसभेला शिर्डीतून उमेदवारी मिळावी, अशी रामदास आठवले यांनी इच्छाही यावेळी व्यक्त केली. तर लोकसभा निवडणुकीत दोन जागा निवडून याव्यात यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, राज्यात ३० जून २०२२ ला शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन बरेच महिने उलटले असले तरी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध अनेक आमदारांना लागले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना आठवले यांनी हे वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत.