Ramdas Athawale : 'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच...', आठवले काय बोलून गेले?

Ramdas Athawale : ‘मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच…’, आठवले काय बोलून गेले?

| Updated on: Dec 08, 2024 | 3:52 PM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक दौऱ्यावर असताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली त्यांना वाटायचे माझ्या शिवाय सत्ता येणार नाही त्यांचे स्वप्न भंग झाले असल्याचे म्हणत हल्लाबोल केला.

राज ठाकरे यांची हवा या विधानसभा निवडणुकीत गेली आहे. ते शंभरहून अधिक जागा लढलेत. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सरकार येणार नाही, अशा स्वप्नात ते राहिले पण त्यांचे स्वप्न भंग झाले, असं म्हणत रामदास आठवले यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या सभांना एवढी गर्दी होतेय पण मतं मिळत नाहीये. त्यावेळी एकटे छगन भुजबळ निवडून यायचे. तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात, पण लोकं ऐकायला येतात आणि निघून जातात ते मतं देत नाहीत. तर राज ठाकरे महायुतीत येतील असं मला वाटत नाही. तर राज ठाकरे त्यांना महायुतीत घेण्यात फायदा नाही मी असताना त्यांची काय गरज आहे, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला. पण महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला राज ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो पण काय निर्णय घ्यायचा तो एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील. पण राज ठाकरेंना घेण्याची गरज नाही आणि त्यांना घेतल्याने आपलं नुकसानच होणार आहे, असाही हल्लाबोल रामदास आठवले यांनी केला आहे. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही. राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे असा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काढला.

Published on: Dec 08, 2024 03:52 PM