'राज ठाकरेंची हवा गेली अन्...', भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवरून रामदास आठवले अन् मनसेमध्ये जुंपली

‘राज ठाकरेंची हवा गेली अन्…’, भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवरून रामदास आठवले अन् मनसेमध्ये जुंपली

| Updated on: Dec 09, 2024 | 11:21 AM

घाटकोपरमधील तीनशे मनसैनिकांच्या ठाकरे गटातील प्रवेशावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पक्ष स्थापनेनंतर काहितरी हेतू लागतो, दिशा लागते असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मनसे नेत्यांमध्ये जुंपली आहे. तर दुसरीकडे घाटकोपरमधील तीनशे मनसैनिकांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या दारूण पराभवानंतर मनसेला मुंबईत दुसरा धक्का बसला आहे. घाटकोपरमधील तीनशे मनसैनिकांच्या ठाकरे गटातील प्रवेशावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पक्ष स्थापनेनंतर काहितरी हेतू लागतो, दिशा लागते असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तर यावर बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी बाळासाहेबांनी दाखवलेली हिंदुत्वाची दिशा सोडल्यावर तुमची काय दशा झालीये, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १२५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तब्बल ११९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आलंय. तर २८ उमेदवारांना नोटाहूनही कमी मतदान मिळालं. तर दुसरीकडे विधानसभेतील दारूण पराभवानंतर भाजप आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी युतीमध्ये लढतील अशी चर्चा होतेय. अशातच रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेण्यात आपला विरोध कायम दर्शविला आहे. तर माझ्याशिवाय सरकार येत नाही म्हणणाऱ्यांची हवा गेली, असं रामदास आठवले यांनी म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.

Published on: Dec 09, 2024 11:21 AM