Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं बळीराजाचं नुकसान, मंत्री संजय बनसोडे शेतकऱ्यांच्या बांधावर अन्...

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं बळीराजाचं नुकसान, मंत्री संजय बनसोडे शेतकऱ्यांच्या बांधावर अन्…

| Updated on: Jul 31, 2023 | 10:17 AM

VIDEO | लातूरच्या जळकोट तालुक्यात जोरदार पावसाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, नुकसानग्रस्त भागाची मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी

लातूर, 31 जुलै 2023 | लातूरच्या जळकोट तालुक्यात जोरदार पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. प्रशासनाने पंचनामा केलेल्या ७८० शेतकऱ्यांच्या तीनशे हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. तर अद्याप पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्यामुळे आपण आशावादी असल्याचे सांगत भविष्यात लातूर शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी लातूरला कसे आणता येईल याबाबत आपण अभ्यास करून पाठपुरावा करणार असून लातूरची तहान भागविण्यासाठी गरजेच्या असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याविषयी अधिवेशन संपल्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत एक बैठकही लातूरला घेणार आहे. या बैठकीत जल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे संजय बनसोडे यांनी काल लातूरात सांगितले आहे.

Published on: Jul 31, 2023 10:17 AM